देहलीच्या यमुना खादर भागात धर्मांधांकडून अनधिकृत थडगी उभारून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण !
देहली प्रशासनाचे दुर्लक्ष !
|
देहली – यमुना खादर भागामध्ये धर्मांधांकडून अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही लावणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. ही थडगी मुसलमान सिद्धपुरुषांची असल्याचे सांगण्यात येत आहे. हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील मानण्यात येत असल्याने सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथून आयकर विभागाचे कार्यालय आणि देहली पोलीस मुख्यालय जवळच आहे. ‘असे असतांना या कारस्थानाकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे’, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात एका स्थानिक राष्ट्रप्रेमी व्यक्तीने ‘यू ट्यूब’वर एक चित्रफीत प्रसारित करून त्या माध्यमातून धर्मांधांचे हे कारस्थान उघड केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना त्याकडे देहली प्रशासन दुर्लक्ष करत असल्याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.