हवेली तालुक्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची नियुक्ती !
कोरेगाव भीमा – हवेली तालुक्याच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी श्री. चंद्रकांत वारघडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते श्री. वारघडे यांना प्रदान करण्यात आले. या समितीचे अध्यक्ष पुणे उपजिल्हाधिकारी असून शासकीय सदस्य म्हणून पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, उपविभागीय मृद संधारण अधिकारी, सहकारी संस्थांचे साहाय्यक उपनिबंधक आणि गटविकास अधिकारी असणार आहेत.
श्री. चंद्रकांत वारघडे हे माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असून माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ अभ्यासक आहेत. माहिती अधिकाराविषयी त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिली आहेत. गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडवणे, शासकीय कार्यालयातील अडचणी दूरध्वनीद्वारे सोडवून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे या कामांची त्यांना आवड आहे. या नियुक्तीमुळे वारघडे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार ! – चंद्रकांत वारघडेश्री. चंद्रकांत वारघडे म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींनी या पदासाठी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि सामान्य नागरिकांचे आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचे आहेत. यापुढील काळातही हवेली तालुक्यात होणार्या भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे.’’ |