परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयीची नाडीपट्टी न सापडणे अन् हा वाईट शक्तींचा अडथळा – पू. डॉ. ॐ उलगनाथनजी
६ वर्षांत प्रथमच सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयीची नाडीपट्टी न सापडणे अन् हा वाईट शक्तींचा अडथळा असल्याचे जाणवणे
‘गेल्या ६ वर्षांपासून सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथनजी सनातन संस्थेच्या तीन गुरूंविषयी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी नाडीपट्टीचे वाचन करत आहेत. त्यांच्याकडे तिन्ही गुरूंच्या दैवी कार्याचा उल्लेख केलेल्या १ सहस्रपेक्षा अधिक नाडीपट्ट्या आहेत. त्यांपैकी ‘विशिष्ट दिवशी कोणती नाडीपट्टी वाचायची ?’, हे त्यांना प्रकाशरूपात दिसते आणि ते बरोबर तीच नाडीपट्टी उचलतात; मात्र आज (१५.३.२०२१ या दिवशी) पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांनी श्री. विनायक शानभाग यांना सांगितले, ‘‘आज मला अजून नाडीपट्टी सापडली नाही.’’
या पूर्वी शक्यतो असे होत नसे. दैवी कृपेने त्यांना नाडीपट्टी लगेच सापडायची. सहस्रो नाडीपट्ट्यांमध्ये ‘कोणत्या नाडीपट्टीमध्ये कोणत्या ठिकाणी गुरुदेव किंवा सनातन संस्था यांविषयी उल्लेख आहे ?’, हे त्यांना कळायचे.
१५.३.२०२१ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांना नाडीपट्टी सापडत नव्हती. ते म्हणाले, ‘‘आज नाडीपट्टी सापडली असती, तर मी दुपारी १२ वाजता नाडीवाचन केले असते. अजून नाडीपट्टी सापडली नसल्याने आज दुपारी २ नंतर नाडीवाचन असेल.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘हाही एकप्रकारे वाईट शक्तींचा अडथळाच आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई (१५.३.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |