मिशो आस्थापनाकडून तिरंग्याच्या मास्कची विक्री !
हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर संकेतस्थळावरून मास्क हटवले !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई – ‘मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले होते. समितीने याविषयी ट्वीट करून मिशो आस्थापनाला हे मास्क हटवण्याची मागणी केली होती. समितीने ट्वीटमध्ये म्हटले होते की, राष्ट्रध्वजाचा वस्तूंवर वापर करणे गुन्हा असल्याने हे मास्क हटवण्यात यावेत. या ट्वीटला मिशो आस्थापनाने लगेच प्रतिसाद देत हे मास्क संकेतस्थळावरून हटवले.
Dear @Meesho_Official
This mask violates the sections of the Flag Code of India, 2002. We demand that you immediately take down this item and stop hosting other such items on your online store.https://t.co/WdGKCMyJfh pic.twitter.com/64syqreEta— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 20, 2022