जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ३ शिधावाटप केंद्रांचे परवाने रहित !
शिधावाटप केंद्रांवर कुणाचा अंकुश नाही, याचे हे उदाहरण ! या केंद्रांचे परवाने रहित करण्यासमवेत त्यांना कठोर शिक्षा होणेही अपेक्षित आहे. – संपादक
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – शिधावाटप केंद्रातील धान्याचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी जयसिंगपूर येथील ३ शिधावाटप केंद्रांचे परवाने रहित करून अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केली. जयसिंगपूर विकास सोसायटीच्या अंतर्गत शिधावाटप केंद्र २, ३ आणि ५ या क्रमांकावर ही कारवाई करण्यात आली आहे. या केंद्रांनी एकूण २९.७९ क्विंटल गहू आणि ४१.११ क्विंटल तांदूळ बाहेर विकला होता.