परवाना नसतांना गाळप केल्याने १६ साखर कारखान्यांवर ६१ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई !
पुणे – ऊस उत्पादक शेतकर्यांना मागील उसाची योग्य आणि किमान आधारभूत रक्कम (एफ्.आर्.पी.) न दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाना दिला नव्हता; मात्र १६ कारखान्यांनी परवाना न घेताच गाळप केल्याने संबंधित कारखान्यांवर प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे ६१ कोटी ३३ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. दंडात्मक कारवाई केलेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ७, पुणे जिल्ह्यातील ४, सांगली जिल्ह्यातील २, तर सातारा, उस्मानाबाद (धाराशिव) आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रत्येकी एक असे एकूण १६ कारखाने आहेत. यातील ४ खासगी, तर १२ सहकारी साखर कारखाने आहेत.