मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !
मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? – संपादक
मुंबई – मध्य रेल्वेने मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या रुळाच्या शेजारी रहाणार्या रहिवाशांना नोटीस पाठवून ७ दिवसांत घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘हे घाबरवण्यासाठी केले जात आहे. घाबरणार कोणीच नाही, जीव देऊ; पण त्यांना वाचवू’, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, सरकारी भूमीवरील अतिक्रमण पाडा असा न्यायालयाचा निकाल आहे, असे सांगत रेल्वेरुळाच्या जवळील घरे ७ दिवसांत खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. जे सरकारी जागेवर रहातात, त्या सर्वांना या नोटिसा जातील.