नाशिक येथे २५ मार्चपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलन !
मराठी साहित्याचे असे पंथानुसार प्रकार निर्माण करून काय साध्य होणार ? हा केवळ पंथीय विभाजनाचाच प्रकार आहे ! – संपादक
मराठी भाषेच्या शुद्धीसाठी मुसलमान आक्रमकांकडून मराठीत आलेले उर्दू, तसेच फारसी, अरबी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धी केली. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ही संकल्पनाच निरर्थक आहे ! – संपादक |
नाशिक – अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य, सांस्कृतिक संस्था आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १४ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २५ ते २७ मार्च या कालावधीत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तन्वीर खान (तंबोली) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. डॉ. फारूख शेख यांनी १९ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.