हरदोई (उत्तरप्रदेश) येथे मदरशातील विद्यार्थ्याकडून १० वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण !
अनेक ठिकाणच्या मदरशांमध्ये अशी संतापजनक कृत्ये चालत असल्याचे वेळोवेळी उघड होऊनही सरकारी यंत्रणांनी असे मदरसे बंद केल्याचे, तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही ! सरकारी यंत्रणा आता तरी अशा मदरशांना टाळे ठोकण्याचे धाडस दाखवणार का ? – संपादक
हरदोई (उत्तरप्रदेश) – येथील जामिया सैय्यद उल् अबरार मदरशामध्ये शिकणार्या १० वर्षीय बालकाशी मदरशातच दुष्कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच मदरशात हाफिजाची (कुराण कंठस्थ करण्याची) पदवी प्राप्त करणार्या अरबाज याला अटक केली आहे.
हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील कोतवाली शाहाबाद भागातील आहे. येथील मदरसा जामिया सैयद उल् अबरारमध्ये बलाईकोट भागात रहाणारा अरबाज हा हाफिजाचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने मरशात शिकणार्या एका १० वर्षांच्या मुलाला मदरशाच्या एका खोलीत नेऊन तेथे त्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. पीडित मुलाने ही माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने पोलीस तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम १७७ आणि ‘पोक्सो’ कायद्यातील ५/६ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हरदोई के मदरसे में 10 साल के बच्चे के साथ सीनियर अरबाज ने किया कुकर्म… यूपी पुलिस ने लिया हिरासत में
https://t.co/v7AKcj9j4t— Sudarshan News (@SudarshanNewsTV) January 20, 2022
बिहारमधील सीतामढी आणि पाटलीपुत्र येथील मदरशांतही घडल्या बलात्काराच्या घटना !
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये मौलवी तबरेज याने त्याच्याच मदरशामध्ये शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. हे कुकृत्य त्याने ध्वनीमुद्रीत केले आणि या चित्रफितीच्या साहाय्याने त्याने पीडितेवर अनेक वेळा बलात्कार केला. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.
अन्य एका घटनेत पाटलीपुत्र (बिहार) येथील मनेर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांतर्गत येणार्या मदरशामध्ये शिकणार्या एका अल्पवयीन मुलीशी शाहबाज रजा नावाच्या मौलवीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.