अरियालूर (तमिळनाडू) येथे कॉन्व्हेंट शाळेच्या छळाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !
ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने शाळेने केला छळ !
|
अरियालूर (तमिळनाडू) – अरियालूर जिल्ह्यातील वडुगापलायम् गावात रहाणारी एम्. लावण्या या थिरुकट्टुपली सेक्रेड हार्ट हायस्कूलमध्ये इयत्ता १२ वीत शिकत होती. तिला शाळेकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात येत होते. त्यास तिने नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या शाळेच्या प्रशासनाने पोंगल (मकरसंक्रातीच्या) सणाच्या सुटीत तिला घरी जाऊ देण्यास नकार दिला. त्याऐवजी तिला वसतीगृहात रहाण्यास भाग पाडले गेले आणि शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करणे, भांडी धुणे अन् स्वयंपाक करणे यांसारखी कामे करायला लावली. या छळामुळे हताश झालेल्या लावण्या हिने बागेत वापरण्यात येणारे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेचा हिंदु संघटनांनी निषेध केला आहे.
स्कूल में पढ़ना है तो ईसाई धर्म अपनाना होगा: तमिलनाडु में मिशनरी स्कूल की प्रताड़ना से तंग आकर 12वीं की छात्रा ने की आत्महत्या#TamilNaduhttps://t.co/WjAZJe8XAy
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 20, 2022
१. लावण्या हिला ९ जानेवारीच्या रात्री उलटी झाली. त्यानंतर तिला जवळच्या चिकित्सालयात नेण्यात आले. तरीही उलट्या होत राहिल्याने वसतीगृहाच्या ‘वॉर्डन’ने तिच्या पालकांना बोलावून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी गेल्यावरही तिने कीटकनाशक प्यायल्याचा खुलासा केला नव्हता. अशा परिस्थितीत तिला तंजावरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भरती करण्यात आले. कीटकनाशक प्राशन केल्याने तिच्या फुफ्फुसाचा जवळजवळ ८५ टक्के भाग प्रभावित झाला होता. तिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू होते.
२. मृत्यूपूर्वी लावण्या हिने दिलेल्या जबाबात म्हटले आहे, ‘शाळा प्रशासनाने माझ्या उपस्थितीत माझ्या पालकांना ‘ते ख्रिस्ती धर्म स्वीकारू शकतात आणि मला पुढील अभ्यासासाठी साहाय्य करू शकतात’, असे सांगितले होते. मी ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्यामुळे शाळेचे प्रशासन मला शिव्या देत राहिले.’ या जबाबात तिच्यावर अत्याचार करणार्या एका महिलेचे नावही तिने घेतले आहे.
३. विश्व हिंदु परिषद, हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना मुलीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. विहिंपचे राज्य प्रवक्ते अरुमुगा कानी म्हणाले, ‘‘लावण्या हिला न्याय मिळेपर्यंत विश्व हिंदु परिषद स्वस्थ बसणार नाही. पहिले पाऊल म्हणून तंजावूर जिल्हा सचिव मुथुवेल यांच्या नेतृत्वाखाली विहिंप उपोषण करणार आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तोपर्यंत आम्ही आंदोलन करू.’’