‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती
‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आतापर्यंत आलेल्या अनुभूती, तसेच हा सोहळा पहातांना त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
श्री. स्वप्नील जोशी, थेरगाव, चिंचवड, पुणे.
१. सत्संगात सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास आरंभ केल्यावर स्वभावदोषांवर मात करणे जमू लागणे : ‘सत्संगात येण्यापूर्वी माझी चिडचिड होत असे. सत्संगात सहभागी झाल्यावर मला सत्संगाची गोडी लागली. सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास आरंभ केला. तेव्हापासून माझी चिडचिड उणावली. मला स्वभावदोषांवर मात करणे जमू लागले.
२. मी कापूर आणि अत्तर यांचे उपाय करू लागल्यामुळे माझ्या शरिरावरील त्रासदायक आवरण घटू लागले. ‘देव माझ्या जवळ आहे’, याची मला अनुभूती आली.
३. मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्याची ओढ लागली.’
सौ. अस्मिता पोहरे, थेरगाव, चिंचवड, पुणे.
१. सत्संगामुळे श्राद्धविधी आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व समजणे : ‘माझ्या सासू-सासर्यांचे माझ्या यजमानांच्या बालपणीच निधन झाले. आम्हाला श्राद्धविधी करण्याचे महत्त्व ठाऊक नसल्याने त्यांचा श्राद्धविधी या पूर्वी कधीही केला नव्हता. सत्संगामध्ये श्राद्धविधी आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व ऐकले. ‘घरात आर्थिक अडचण असणे, मानसिक ताणतणाव असणे, चिडचिड होणे’, हे सर्व पितरांच्या त्रासामुळे होत असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘पूर्वजांचे आपल्यावर ऋण आहेत आणि त्यांना पुढची गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करायला हवा’, हे सत्संगाच्या माध्यमातून कळले. त्यामुळे आम्ही या वर्षी महालय श्राद्धविधी केले. श्राद्धविधीच्या दिवशी सकाळपासून आम्ही दत्तगुरूंना प्रार्थना करत होतो. आम्ही नामस्मरण करत श्राद्धविधी केला. त्या दिवशी घरात एक फुलपाखरू आले होते. त्या माध्यमातून ‘आमचे पूर्वज घरी आले आहेत’, असे मला वाटले.’
सुनंदा काटकर, थेरगाव, चिंचवड, पुणे.
१. सत्संग ऐकल्याने नामजपाची गोडी लागून नामस्मरण भावपूर्ण होणे आणि घरात आनंदी वातावरण होणे : ‘मी सत्संग ऐकू लागल्यापासून ‘नामस्मरण कोणते करायचे ?’, हे माझ्या लक्षात आले. मी नामस्मरण करायला लागल्यापासून घरात आनंदी वातावरण जाणवत आहे. माझे नामस्मरण भावपूर्ण होते. मला नामस्मरणाची गोडी लागली आहे.
२. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यापासून ‘दत्तगुरु मला आशीर्वाद देत आहेत आणि त्यांच्या चरणांना हात लावल्यावर शरिरात चैतन्य जात आहे’, असे मला जाणवते.
३. दळणवळण बंदीच्या कालावधीत सत्संगाच्या माध्यमातून पुष्कळ चांगली माहिती आणि ज्ञान मिळत आहे.’
सौ. लक्ष्मी गडदे, थेरगाव, चिंचवड, पुणे.
१. ‘मी सत्संगात सहभागी झाल्यामुळे माझ्यातील चिडचिडेपणा, अस्थिरता आणि हळवेपणा न्यून झाला आहे.
२. यापूर्वी घरात काही प्रसंग झाले, तर माझ्याकडून क्षमा करण्याचा भाग होत नव्हता. आता माझ्यातील क्षमा करण्याचा भाग वाढला आहे. प्रसंग झाले, तरी मी ते मनाला लावून घेत नाही.
३. प्रार्थनेचे महत्त्व माझ्या लक्षात आले असून वास्तुदेवतेला प्रार्थना करण्यास चालू केल्यापासून वास्तूत प्रसन्न वाटते.
४. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास आरंभ केल्यावर मनातील भीतीचे प्रमाण न्यून होणे : ‘कापूर आणि अत्तर लावणे, मारुतिरायाकडून सूक्ष्मातून दृष्ट काढून घेणे’, हे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला आरंभ केल्यावर माझ्या मनातील भीतीचे प्रमाण न्यून झाले. मला कोरोनाच्या कालावधीत भीती वाटली नाही.’
(क्रमशः उद्याच्या अंकात)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |