उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. ज्ञानेश अविनाश पोवार !
५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला लिंगनूर (कापशी) ता. कागल, जिल्हा कोल्हापूर येथील कु. ज्ञानेश अविनाश पोवार (वय १२ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ज्ञानेश पोवार हा या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. कु. ज्ञानेशच्या आईने नामजपादी उपाय करणे : ‘कु. ज्ञानेशच्या आईला गरोदरपणात भिमसेनी कापराचे उपाय करायला आवडायचे. त्या वेळी ती कापराचा वास घेणे आणि कापूर शरिराला लावणे, असे करत होती. ती सातत्याने श्री दुर्गादेवीचा नामजप ऐकत होती.
२. जन्मानंतर
२ अ. ज्ञानेशच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी श्रीरामरक्षा म्हणत असतांना मला ज्ञानेशच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.
२ आ. त्याला भजनाची पुष्कळ आवड आहे. त्याला ‘श्रीरामाचा पाळणा’ आणि ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत अन् ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे देशभक्तीपर गीत आवडते.
२ इ. देवाची आवड : त्याला देवपूजा करायला आवडते. त्याला देवाला उदबत्ती दाखवणे आणि नैवेद्य दाखवणे आवडते.
२ ई. समंजस : एकदा त्याला सांगितले, ‘‘चॉकलेट खाल्यानंतर दात किडतात.’’ त्यानंतर त्याला कुणीही ‘चॉकलेट’ दिले, तरी तो ‘नको’ म्हणून सांगतो.
२ उ. व्यवस्थितपणा : तो ताटातील सर्व अन्नपदार्थ संपवतो. ताटाबाहेर काही सांडले असल्यास तो ते उचलून घेतो.
२ ऊ. साधनेची ओढ : ज्ञानेश शाळेत जातांना जयघोष करतो. तो गुरुस्मरण करतो. त्याला सत्संग ऐकायला आवडतात.
३. स्वभावदोष
स्वतःची वस्तू इतरांना न देणे आणि हट्टीपणा.’
– श्री. अविनाश आत्माराम पोवार (ज्ञानेशचे वडील), लिंगनूर (कापशी) ता. कागल, जिल्हा कोल्हापूर. (१४.९.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |