चिनी सैन्याकडून अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून १७ वर्षीय मुलाचे अपहरण !
‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद ! – संपादक
ईटानगर (अरुणाचल प्रदेश) – चीनच्या सैन्याने अरुणाचल प्रदेशात घुसून १७ वर्षीय भारतीय तरुण मीरम तारण याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशातील भाजपचे खासदार तापीर गाओ आणि काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी भारत सरकारकडे तातडीने त्याची सुटका करण्याची मागणी केली आहे.
A 17-year-old resident of Arunachal Pradesh, has allegedly been abducted by China’s Peoples’ Liberation Army (PLA) from the state’s Upper Siang district, officials privy to the matter said.
(reports @utpal_parashar)https://t.co/pi1QvN1i7K
— Hindustan Times (@htTweets) January 20, 2022
खासदार तापीर गाओ म्हणाले की, हे अपहरण सियांग जिल्ह्यातील लुंगटा जोर भागातून झाले आहे. चिनी सैन्याच्या कह्यातून पळून आलेल्या अन्य एका मुलाने स्थानिक अधिकार्यांना याची माहिती दिली. येथे चीनने वर्ष २०१८ मध्ये भारताच्या सीमेत ३-४ किलोमीटरचा रस्ता बनवला आहे.