इंदापूर (पुणे) येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या ५ गोवंशियांची सुटका, एका धर्मांधास अटक !
गोवंश हत्या बंदी कायदा धाब्यावर बसवल्यास गोहत्या थांबणार कधी ? – संपादक
इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील अकलूज रस्त्यावर इंदापूर पोलिसांनी गस्तीच्या काळात १६ जानेवारीच्या रात्री पावणे आठ वाजता गोवंशियांची निर्दयीपणे वाहतूक करणार्या २ चारचाकी वाहनांवर कारवाई करून १८ लाख ८५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात पोलीस नाईक अमोल गायकवाड यांच्या तक्रारीवरून शहबाज कुरेशी आणि पळून गेलेल्या अज्ञात चालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. कुरेशी यास अटक करण्यात आली आहे. (अशा आडदांड प्रवृत्तीच्या कसायांवर कायद्याची कठोर कार्यवाही करावी ! – संपादक) दोन्ही वाहनांतील १ जर्सी गाय आणि ४ मोठ्या खिलार देशी गायींसाठी चारा-पाण्याची सोय न करता त्यांना दाटीवाटीने बांधून निर्दयीपणे वाहतूक करतांना आढळून आल्या.