हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मकरसंक्रांत’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनाला उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘मकरसंक्रांत’ सणाचे धर्मशास्त्र लोकांपर्यंत पोचावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाला उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समितीच्या सौ. सानिका सिंह यांनी मकरसंक्रांतीविषयीचे शास्त्र जिज्ञासूंना सांगितले. तसेच समितीच्या कार्याविषयीची माहिती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी, तर सनातन संस्थेच्या आश्रमाची वैशिष्ट्ये सनातनचे श्री. संजय सिंह यांनी सांगितली.
समितीच्या सौ. सानिका सिंह म्हणाल्या की, सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र समजल्यावर ते अधिक श्रद्धेने साजरे केले जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होते. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीचा काळ पर्वकाळ असतो. या काळात अधिकाधिक साधना, दान, पुण्य करून आपण याचा आध्यात्मिक लाभ घेऊ शकतो. हा सण भारतासह बांगलादेश, थायलंड, नेपाळ, लाओस, श्रीलंका आणि ब्रह्मदेश या देशांमध्येही साजरा करण्यात येतो. सौ. सिंह यांनी उपस्थित जिज्ञासूंना अर्पण करण्याचे आवाहन केले. या प्रवचनाचा ९१ जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. सनातन आश्रमाचे वैशिष्ट्य याविषयी सनातनचे श्री. संजय सिंह यांनी आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य याविषयी समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी माहिती दिली.
२. जिज्ञासूंनी प्रवचनानंतर अर्पण करण्याची सिद्धता दर्शवली.