‘आय.एन्.एस्. रणवीर’ या युद्धनौकेतील स्फोटात ३ सैनिकांचा मृत्यू !
|
मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये १८ जानेवारी या दिवशी ‘आय.एन्.एस्. (इंडियन नेव्हल शिप) रणवीर’ या युद्धनौकेमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात नौदलाच्या ३ सैनिकांचा मृत्यू झाला, तर ११ सैनिक घायाळ झाले. घायाळ झालेल्यांवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. या युद्धनौकेच्या अंतर्गत भागात हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर नौकेवरील कर्मचार्यांनी तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. या स्फोटात नौकेची फारशी हानी झालेली नाही. स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. ‘आय.एन्.एस्. रणवीर’ ही युद्धनौका नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडमधून येथे कार्यवाहीसाठी तैनात होती. ती लवकरच तिच्या तळावर परत जाणार होती.
Blast in #INSRanveer, 3 Marines lost their lives and some injured. Board of Inquiry is ordered in this regard by the @indiannavy pic.twitter.com/AeurEflp2R
— DD News (@DDNewslive) January 19, 2022