पिंपरी (पुणे) जिजामाता रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांचे २ मासांपासून वेतन थकित !
पिंपरी – येथील जिजामाता रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा ऑपरेटर, मामा, मावशी, सुरक्षारक्षक अशा कंत्राटी पद्धतीने कामावर असणार्या ११५ कर्मचार्यांचे वेतन २ मासांपासून थकले आहे. त्यामुळे या सर्वांनी काम बंद आंदोलन चालू केले आहे. श्रीकृपा एजन्सीच्या माध्यमातून हे सर्वजण कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. ‘वेतन कधी होणार’, अशी एजन्सीकडे विचारणा केली असता ‘महापालिकेला विचारा’, असे सांगितले जाते, तर महापालिकेकडे विचारणा केली असता ‘एजन्सीला विचारा’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. वेतन मिळाले नाही, तर घर कसे चालवायचे ? घर भाडे कसे द्यायचे ? असा प्रश्न कर्मचार्यांनी विचारला.