महाविकास आघाडीचे ५७ नगरपंचायतींवर वर्चस्व, तर भाजपकडे २४ नगरपंचायती !
मुंबई – राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल २० जानेवारी या दिवशी घोषित होणार आहेत.
भाजपला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्र्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला १८ नगरपंचायती आणि २९७ जागा तसेच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरपंचायती आणि ९७६ जागा, तर भाजपला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, भाजपचे गिरीश महाजन या नेत्यांना फटका बसला, तर नितेश राणे त्यांचा गड राखण्यात यशस्वी झाले. शिवसेनेचे महेश शिंदे यांनीही सातार्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांना धक्का दिला. सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गियांचे राजकीय आरक्षण रहित करून या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. यानुसार १८ जानेवारी या दिवशी मतदान झाले.