ईरोड, तमिळनाडू येथील कस्तूरी रंगनाथ मंदिरात करण्यात आलेल्या महालक्ष्मीदेवीच्या लक्षार्चनेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सहभागी होणे
‘श्री महालक्ष्मीदेवीचे मंत्र म्हणत देवीची पुष्पांनी अर्चना (देवीला फुले वहाणे) करणे म्हणजे लक्षार्चना होय.’
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या ‘लक्षार्चना’ पूजेत कार्तिकपुत्रीने (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) सहभागी व्हावे’, असे सप्तर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगणे
‘चेन्नई येथे झालेल्या १७२ व्या सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनात सप्तर्षींनी सांगितले, ‘‘२७.२.२०२१ या दिवशी ईरोड येथे श्री कस्तूरी रंगनाथ मंदिरात गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आरोग्य चांगले रहाण्यासाठी एक दिवसाची श्री महालक्ष्मीदेवीची ‘लक्षार्चना’ आयोजित केली आहे. यात कार्तिकपुत्रीने सहभागी व्हावे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शनीची साडेसाती चालू असल्याने ही लक्षार्चना पूजा शनिवारीच ठेवण्यात आली आहे.’ नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या ईरोड येथील नाडीभक्तांना सांगून ही पूजा आयोजित केली होती.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी लक्षार्चनेत सहभागी होणे आणि त्या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’ यासाठी नामजप अन् प्रार्थना करणे
सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे २७.२.२०२१ या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ईरोड येथे झालेल्या या लक्षार्चना पूजेत सहभागी झाल्या. या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांना शारीरिक थकवा असतांनाही ते सलग २ घंटे मांडी घालून नामजपाला बसले होते. ते ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यासाठी प्रार्थना करत होते.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), ईरोड, तमिळनाडू. (६.४.२०२१)