‘अॅमेझॉन’वर राष्ट्रध्वजाच्या रंगासारख्या ‘टी शर्ट’ची विक्री !
हिंदूंच्या देवता आणि भारताचा राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान करणार्या अॅमेझॉनला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावून या आस्थापनावर बंदी घालण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांना वाटते ! – संपादक
मुंबई – ‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत. यापूर्वीही या आस्थापनाकडून राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे बूट, पायपुसण्या, टॉयलेट सीट कव्हर, मास्क आदींची विक्री करण्यात आली होती. राष्ट्रध्वजाविषयी आचारसंहिता आहे. तिचे उल्लंघन केल्यास ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
Despite respectfully demanding the removal of outfits that violated sections of the Flag Code of India, 2002, @AmazonIN has taken no action.
For such transgressions, we request the @HMOIndia to take legal action against Amazon. #Amazon_Insults_NationalFlag https://t.co/lmGijLyrsn pic.twitter.com/WNU9HeioHi
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 18, 2022
१. यापूर्वीही अॅमेझॉनकडून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी त्याला राष्ट्रप्रेमींकडून विरोध करण्यात आला होता. तरीही अॅमेझॉनकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणे थांबत नसल्याचे या घटनेतून पुन्हा दिसून आले आहे. पूर्वी हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्या पायपुसण्या विक्रीला ठेवण्यात आल्यावर तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला चेतावणी देऊन क्षमा मागण्यास सांगितले होते.
२. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा हिंदु जनजागृती समितीकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच ‘राष्ट्रप्रेमींनी याचा संयत आणि वैध मार्गाने विरोध करावा’, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.
निषेध नोंदवण्यासाठी संपर्क:संपर्क : twitter.com/amazonIN |
राष्ट्रद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !
राष्ट्रद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा ! |