परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !
‘हे ज्ञान सूक्ष्मातील आणि त्याची भाषाही उच्च स्तराची असल्यामुळे मीही हे कठीण ज्ञान एकदा वाचायचा प्रयत्न केल्यावर ४ वर्षे बाजूला ठेवून दिले होते. आता ते वाचण्याचा २-३ वेळा प्रयत्न केल्यावर थोडे-फार समजते. या ज्ञानाची भाषा सर्वसाधारण ज्ञानाच्या तुलनेत १० टक्के कठीण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१२.२०२१)
ज्ञानप्राप्तकर्ते : श्री. निषाद देशमुख (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
(लेख ६.)
(लेख ५.) ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/544175.html
अनुक्रमणिका
१. औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे
२. वृक्षातून तेजतत्त्वाच्या स्तरावरील चैतन्य प्रक्षेपण होण्याची प्रक्रिया
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे निर्गुण तेजतत्त्व हे बाह्य घटक असणे
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व औदुंबर वृक्षात प्रक्षेपित झाल्यामुळे त्याची पाने अधिक तेजस्वी दिसण्यामागील होणारी प्रक्रिया
५. समष्टी स्तरावरील आक्रमणे सोसून औदुंबर वृक्ष चैतन्य प्रक्षेपित करण्याचे सगुण माध्यम बनणे
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याच्या प्रक्षेपणाचे पानांकडून घनीकरण होऊन त्याचे प्रक्षेपण पानांकडून होत असल्याने निर्माण झालेल्या दैवी कणांमुळे पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसणे
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रकट होत असलेले निर्गुण तेजतत्त्व (प्रकाश) समष्टीत प्रक्षेपित करण्यासाठी वृक्षात असलेले दैवी कण तीव्रतेने गतीमान झाल्याने त्याची पाने अधिक तेजस्वी दिसणे
१. मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते. तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही. जिवाला पूर्ण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण आवश्यक नसल्याने वायूमंडलातील जिवांच्या तेजतत्त्व ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार थराच्या आकारात पालट होऊन तेजतत्त्व प्रक्षेपित केले जाते. त्याप्रमाणे औदुंबर वृक्षातील पानांच्या आत कार्यरत दैवी कणांच्या थराच्या आकारात परिवर्तन होते.
ही प्रक्रिया निरंतर चालू असते; पण सूर्यप्रकाशाच्या अभावी लक्षात येत नाही. सूर्यप्रकाशाच्या सगुणत्वामुळे चालू असलेल्या प्रक्रियेचे घनत्व झाल्याने ‘पानांकडून सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन केले जात आहे’, असे जाणवते. ही प्रक्रिया करतांना पानांच्या आत असलेल्या दैवी कणांच्या आच्छादनाचे तेजतत्त्वामुळे घनीकरण होत असल्याने पाने तेजस्वी झाल्याचे दिसतात.’
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समजण्यास सोपे केलेले ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर पानांच्या आत कार्यरत असलेल्या दैवी कणांच्या थरामुळे प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे : तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असते. औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही. जिवाला तेजतत्त्वाचे पूर्ण प्रक्षेपण होणे आवश्यक नसल्याने वायूमंडलातील जिवांच्या तेजतत्त्व ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार दैवी कणांच्या थराच्या जाडीत पालट होऊन तेजतत्त्व प्रक्षेपित केले जाते. औदुंबर वृक्षातील पानांच्या आत कार्यरत असलेल्या दैवी कणांच्या थराच्या आकारानुसार प्रकाशाचे परावर्तन होते.
ही प्रक्रिया निरंतर चालू असते; पण सूर्यप्रकाशाच्या अभावी ती लक्षात येत नाही. सूर्यप्रकाशाच्या सगुणत्वामुळे चालू असलेल्या प्रक्रियेचे घनत्व झाल्याने ‘पानांकडून सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन केले जात आहे’, असे जाणवते. ही प्रक्रिया करतांना पानांच्या आत असलेल्या दैवी कणांच्या आच्छादनातील तेजतत्त्वाचे घनीकरण होत असल्याने पाने तेजस्वी झाल्याचे दिसतात.’
२. मुळात सोपे असलेले ज्ञान – वृक्षातून तेजतत्त्व स्तरावरील चैतन्य प्रक्षेपण करण्याची प्रक्रिया
वृक्ष निर्गुण चैतन्य ग्रहण करून त्याचे निर्गुण-सगुण माध्यमातून प्रक्षेपण करतो, म्हणजे निर्गुण शक्तीला (ईश्वरी तत्त्वाला) सगुणातून (पानांतून) प्रक्षेपित करतो.
३. मूळ समजण्यास कठीण ज्ञान – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे निर्गुण तेजतत्त्व बाह्य घटक असणे
औदुंबराच्या वृक्षात निर्गुण तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता असून ते त्यात संचारत असते. औदुंबराचा वृक्ष त्या तत्त्वाचे निर्गुण-सगुण स्वरूपात प्रक्षेपण करतो. निर्गुण तत्त्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे निर्गुण तेजतत्त्व औदुंबराला बाह्य माध्यमातून मिळणारा घटक आहे.
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समजण्यास सोपे केलेले ज्ञान – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे निर्गुण तेजतत्त्व हे बाह्य घटक असणे : औदुंबराच्या वृक्षात निर्गुण तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता असून ते त्यात संचारत असते. औदुंबराचा वृक्ष त्या तत्त्वाचे निर्गुण-सगुण स्वरूपात प्रक्षेपण करतो. ईश्वराकडून औदुंबराला बाह्य माध्यमातून मिळणारा हा घटक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे निर्गुण तेजतत्त्व हा त्याचा एक बाह्य घटक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते.
४. मूळ मिळालेले समजण्यास कठीण ज्ञान – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व औंदुबरात प्रक्षेपित झाल्यामुळे पाने अधिक तेजस्वी दिसण्यामागील होणारी प्रक्रिया
औंदुबरात असलेले निर्गुण तेजतत्त्व संचारित होऊन पानांत दैवी कणांचे थर निर्माण करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे प्रकाशस्वरूपी निर्गुण तेजतत्त्व या थरावर येऊन गती न्यून न होता पानातील सगुण धारणेच्या माध्यमातून प्रक्षेपित होते. थरातून पानाच्या सगुणत्व माध्यमातून प्रक्षेपण होतांना सगुणत्व न झालेले दैवी कणांच्या पानांत आच्छादन निर्माण होते. पानांत असलेला दैवी कणांचा थर पानांत असलेल्या देठात (पानांच्या मध्यभागी असलेली रेषा आणि त्याचा जवळच्या शिरा) आणि दैवी कणांचे आच्छादन पानांत असते. देठ वृक्षाशी जोडलेला असल्याने निर्गुण शक्तीच्या प्रवाहाचे देठातून वृक्षात आणि वृक्षातून देठात येणे-जाणे चालू असते. निर्गुण चैतन्य पूर्ण वृक्षात कार्यरत असल्याने प्रवाहात निर्माण होणारे दैवी कण घनीकृत होऊन दिसत नाहीत. पानांत दैवी कणांचे आच्छादन निर्माण झालेले असल्याने त्याचे घनीकरण होऊन पाने अधिक तेजस्वी दिसतात.
४ अ. सोपे केलेले ज्ञान – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व औदुंबर वृक्षात प्रक्षेपित झाल्यामुळे त्याची पाने अधिक तेजस्वी दिसण्यामागील होणारी प्रक्रिया : औदुंबरात असलेले निर्गुण तेजतत्त्व संचारित होऊन पानांत दैवी कणांचे थर निर्माण करते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व ‘प्रकाशस्वरूपी निर्गुण तेजतत्त्व’ या थरावर आल्यावर त्याची गती न्यून न होता ते पानातील सगुणधारणेच्या माध्यमातून प्रक्षेपित होते. पानांच्या सगुणत्व माध्यमातून प्रक्षेपण होतांना सगुणत्व न आलेल्या दैवी कणांचे पानांत आच्छादन निर्माण होते. पानांत असलेला दैवी कणांचा थर पानांच्या देठांत, तसेच पानांच्या मध्यभागी असलेल्या रेषा आणि त्यांच्या जवळच्या शिरा यांच्यात असतो. देठ वृक्षाशी जोडलेला असल्याने निर्गुण शक्तीच्या प्रवाहाचे देठातून वृक्षात आणि वृक्षातून देठात येणे-जाणे चालू असते. निर्गुण चैतन्य पूर्ण वृक्षात कार्यरत असल्याने प्रवाहात निर्माण होणारे दैवी कण घनीकृत होऊन दिसत नाहीत. पानांत दैवी कणांचे आच्छादन निर्माण झालेले असल्याने त्यांचे घनीकरण होऊन पाने अधिक तेजस्वी दिसतात.
५. मूळ समजण्यास कठीण ज्ञान – समष्टी स्तरावरील आक्रमण सोसून औदुंबर वृक्ष चैतन्य प्रक्षेपित करण्याचे सगुण माध्यम बनणे
‘औदुंबराच्या वृक्षाने समष्टी स्तरावरील आक्रमण सोसल्याने तो समष्टी कार्याचा एक भाग झाला. तो परत कार्य करण्याच्या स्थितीत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य समष्टी स्तरावर प्रक्षेपित करण्याचे सगुण माध्यम झाला.
५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समजण्यास सोपे केलेले ज्ञान : समष्टी स्तरावरील आक्रमणे सोसून औदुंबर वृक्ष चैतन्य प्रक्षेपित करण्याचे सगुण माध्यम बनणे : ‘औदुंबराचा वृक्ष समष्टी स्तरावरील आक्रमण सोसतो, म्हणजे तो समष्टी कार्याचा एक भाग आहे. तो परत कार्य करण्याच्या स्थितीत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य समष्टी स्तरावर प्रक्षेपित करण्याचे सगुण माध्यम होतो.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रक्षेपण घनीकृत करून त्याचे प्रक्षेपण पानांकडून होत असल्याने निर्माण झालेल्या दैवी कणांमुळे पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसणे
औदुंबर वृक्षात ईश्वरी तत्त्व ग्रहण करून प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेले तेजतत्त्वाच्या स्तरावरील निर्गुणात्मक सगुण चैतन्य ग्रहण करून ते समष्टी कार्यासाठी निर्गुण-सगुण माध्यमातून प्रक्षेपित केले जाते. चैतन्य प्रक्षेपित करतांना त्या चैतन्याचे प्रकट संचारण पाने, फुले आणि फळे यांच्या माध्यमातून केले जाते.
औदुंबराच्या पानांकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य निर्गुण स्तरावर प्रक्षेपित केले जाते. दुपारी सूर्यप्रकाशातून प्रकटत असलेल्या सगुणत्व असलेल्या तेजतत्त्वामुळे होणार्या प्रक्रियेला घनत्व प्राप्त होऊन प्रक्षेपणाच्या माध्यमातही सगुणत्व वाढते. त्यामुळे सूर्यप्रकाश पडल्यावर पाने अधिक चकाकत असल्यासारखे दिसतात.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रकट होत असलेले निर्गुण तेजतत्त्व (प्रकाश) समष्टीत प्रक्षेपित करण्यासाठी वृक्षात असलेले दैवी कण तीव्रतेने गतीमान झाल्याने त्याची पाने अधिक तेजस्वी दिसणे
औदुंबरात निर्गुण तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबरावर समष्टी स्तरावरील आक्रमण होऊनही देवाने त्याचे रक्षण केले. त्यामुळे त्याची निर्गुणत्व ग्रहण करण्याची क्षमता वाढली आहे. यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होत असलेल्या निर्गुण स्तरावरील तेजतत्त्वाला प्रकाशस्वरूपात समष्टीत प्रक्षेपित करणे औदुंबराला शक्य होते.
सर्वसाधारणत: कोणतीही शक्ती ग्रहण करून मग प्रक्षेपित केली जाते. औदुंबर सगुणात कार्यरत असल्याने त्याला सगुणत्वाशी निगडित मर्यादांचे पालन करावे लागते. निर्गुण तेजतत्त्वाला ग्रहण करण्याला वृक्षाला मर्यादा असतात. समष्टी स्तरावर कार्यानुरूप प्रक्षेपण आवश्यक असल्याने वृक्षातील तेजतत्त्वाचे सूक्ष्म घनीकरण होऊन पानांमध्ये पारदर्शक दैवी कणांचा थर निर्माण होतो. या थरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण तेजतत्त्व प्रतिबिंबित होऊन दैवी कणांच्या थरातील पारदर्शकतेमुळे ते वायूमंडलात प्रक्षेपित होते.
– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१७, दुपारी १२.५०)
(लेख ७.) ‘पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/545830.html