बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये एम्.ए.साठी देशातील पहिल्या ‘हिंदु अभ्यासक्रमा’स प्रारंभ !
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्वविद्यालयात एम्.ए.साठी ‘हिंदु अभ्यासक्रम’ हा नवीन अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. देशातील अशा प्रकारचा पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय कुमार शुक्ला यांनी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. हा अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय शिक्षा नीती, २०२०’नुसार सिद्ध करण्यात आला आहे. कला शाखेच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम असणार आहे. दर्शनशास्त्र आणि धर्म विभाग, संस्कृत विभाग अन् प्राचीन भारतीय इतिहास, तसेच संस्कृती आणि पुरातत्व विभाग यांच्या सहयोगातून हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे.
Banaras Hindu University in #Varanasi has started a new postgraduate course – masters in Hindu Studies#BanarasHinduUniversityhttps://t.co/yXcS9tsAT1
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 19, 2022
कुलपती डॉ. विजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम जगातील हिंदु धर्माच्या अज्ञात पैलूंची माहिती आणि शिक्षण देणारा आहे. याच्या पहिल्या तुकडीमध्ये ४५ विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. यात काही विदेशी विद्यार्थीही आहेत. (उद्या हेच परदेशी विद्यार्थी भारतीय हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)