इंग्रजीची भोंगळ वर्णमाला आणि संस्कृतची शुद्ध अन् शास्त्रीय वर्णमाला
‘आमची प्राचीन सनातन हिंदु संस्कृती अत्यंत शुद्ध व शास्त्रीय आहे. तिच्यात प्रवेश करायचा म्हटले, तर शुद्ध वर्णमाला हवी. इंग्रजी वर्णमाला ही अत्यंत अशुद्ध आहे. इंग्रजी डब्लू (w) हा वर्ण आहे. ड् अ ब् ल् उ आणि अर्धवर्ण ‘व्’ हा कसला भयानक भोंगळपणा ! इंग्रजीच्या अशुद्ध वर्णमालेच्या मर्यादा संगणकाला जाणवतात. हे प्रतिबंध निवारण्याकरता देवनागरी संस्कृत लिपी सोयीची आहे. आमच्या शुद्ध वर्णमालेचे हे अंगभूत सामर्थ्य जगाला स्वीकारावेच लागेल. वर्णाशी असणारा शास्त्रीय अर्थ हा शुद्ध असेलच. वर्णमालेचा आणि शास्त्रीय अर्थाचा असा हा परस्पर जिवाभावाचा संबंध आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी