मुंबईतील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित !
मुंबई – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबई महापालिकेने विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने यासंदर्भात ट्वीट केले आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. लवकरच ऑनलाईन वेळ आणि दिनांक घेऊन विवाह नोंदणी सेवा चालू करण्यात येईल. यासाठी व्हिडिओ के.वा.य.सी.चा पर्याय देण्याचा पालिकेचा विचार आहे. विवाह नोंदणीच्या संदर्भात काही शंका असल्यास प्रभाग अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
The Marriage Registration service is temporarily stopped by @mybmchealthdept due to the current COVID19 situation in Mumbai
The Service will be restarted very soon with the facility of appointment date and time.
Going ahead BMC is also exploring the provision of Video KYC option.— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 15, 2022