कुठे अंगप्रदर्शन करून समाजाला वासनांध बनवणार्या सध्याच्या काळातील स्त्रिया, तर कुठे सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !
आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे !
‘यज्ञकुंडाच्या एका बाजूला (मेखलेवर) योनीपिठाची जागा असते. तेथे यज्ञशक्तीचा निवास असतो. एकदा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी याग करतांना अकस्मात् योनीपिठावर (टीप) झाकलेले वस्त्र उडाले आणि ते यज्ञकुंडातील अग्नीत पडले. यासाठी आम्ही प्रायश्चित्तही घेतले.
या प्रसंगाचा विचार करतांना माझ्या मनात आले, ‘आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे ! येथे असणार्या योनीपिठाच्या लज्जारक्षणासाठीही त्यावर वस्त्र झाकलेले आहे. केवढी ही शालीनता ! बाहेर समाजात फिरणार्या स्त्रिया पहा ! त्यांना काही लाजलज्जाच राहिलेली नाही. त्या अंगप्रदर्शन करून सार्या समाजाला एक प्रकारे वासनांधच बनवत आहेत.’
वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजींनी सांगितले, ‘‘यज्ञकुंडावर असलेले योनीपीठ हे सृजनशीलतेचे प्रतीक आहे. हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे. यज्ञ करतांना यज्ञातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने ढगांनाही गर्भधारणा होऊन पाऊस पडतो. यज्ञात इतके सामर्थ्य आहे.’’
या योनीपिठाच्या ठिकाणी साक्षात् आदिमाया आणि आदिशक्ती यांचा वास असतो. त्यामुळे योनीपिठावर वस्त्र घालून त्यांचे लज्जारक्षण केले जाते. ‘सध्याच्या समाजातील स्त्रियांनी स्वतःचे पावित्र्य किती जपले पाहिजे ?’; परंतु असा विचार कुणीही करतांना दिसत नाही. सर्वत्र व्यभिचार चालला आहे. मला समाजाची ही अवस्था पहावत नाही. आता अशांना देवानेच दंड द्यायला हवा.’
(टीप : यज्ञकुंडाला नाभी, ग्रीवा, कंठ आदी अवयव असतात, तसेच पश्चिमेच्या बाजूला योनी हा अवयव असतो. ही प्रकृती पुरुषाचे लक्षण आहे. यावर गौरीदेवीचे (पार्वतीचे) आवाहन करून त्याला वस्त्राचे आच्छादन करण्यास ‘कुंड संस्कार विधी’त सांगितले आहे.)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१३.५.२०२१)