चॉकलेटच्या वेष्टनावर भगवान जगन्नाथाचे चित्र छापल्याप्रकरणी ‘नेस्ले’कडून क्षमायाचना
जागृत हिंदूंनी सामाजिक माध्यमांमधून केलेल्या जागृतीचा परिणाम
नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्या जागृत हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक
नवी देहली – बहुराष्ट्रीय आस्थापन ‘नेस्ले’ने त्यांच्या ‘किटकॅट’ या चॉकलेटच्या वेष्टनावर भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा यांचे चित्रे छापले होते. याविरोधात जागृत हिंदूंनी सामाजिक माध्यमांमधून आवाज उठवला. त्यामुळे वाद निर्माण निर्माण झाल्याने ‘नेस्ले’ने क्षमायाचना केली आहे, तसेच आस्थापनाने अशा प्रकारची सर्व उत्पादने बाजारातून परत मागवली आहेत.
‘किटकॅट’ चॉकलेटच्या रॅपरवर देवाचा फोटो; टीकेनंतर कंपनीचा माफीनामाhttps://t.co/YAbBsIQcQy
— Lokmat (@lokmat) January 17, 2022
१. सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी सांगितले की, चॉकलेट खाल्ल्यानंतर लोक त्याचे वेष्टन इतरत्र किंवा कचराकुंडीत फेकून देतात. त्यामुळे या वेष्टनावर देवतांचे चित्र लावल्याने त्यांचा अवमान होतो.
२. ‘नेस्ले’ने स्पष्टीकरण देतांना सांगितले की, त्यांच्या ‘ट्रॅव्हल ब्रेक पॅक’चा (प्रवासातील विश्रांतीच्या वेळी खाण्यासाठी बनवलेले बिस्कीटांची बांधणी) उद्देश स्थानिक डेस्टिनेन्शसची (गंतव्य ठिकाणाची) सुंदरता साजरी करणे, हा होता. त्याप्रमाणे त्यांनी या पॅकमध्ये ओडिशा संस्कृती दाखवली होती. यासाठी त्यांनी अद्वितीय कला असलेल्या पट्टचित्राची झलक दाखवणारी रचना या पॅकवर वापरली होती.
३. आस्थापनाने सांगितले की, वेष्टनावर वापरलेल्या चित्राची प्रेरणा सरकारच्या पर्यटन संकेतस्थळावरून घेतली आहे. आम्हाला या कलेशी संबंधित कलाकारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी लोकांना प्रेरित करायचे होते. ग्राहक अशी सुंदररचना त्यांच्याकडे जपून ठेवतात, असे लक्षात आले आहे.
४. नेस्लेने क्षमायाचना करतांना म्हटले की, जर अनावधानाने या चुकीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते त्यांची क्षमा मागत आहेत.