(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हे वर्ष १९४७ पेक्षा मोठे स्वातंत्र्य !’
काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात भाजपपासून मुक्ती मिळवणे, हा वर्ष १९४७ पेक्षा (भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापेक्षा) मोठे स्वातंत्र्य असेल; कारण भाजप देशाची विभागणी करू इच्छित आहे, अशा शब्दांत काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या (‘पीडीपी’च्या) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी मुक्ताफळे उधळली. उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या आदिवासी युवा संमेलनात त्या बोलत होत्या.
‘Voting the BJP out will be a greater Azadi than 1947’: Mehbooba Mufti in Jammuhttps://t.co/yNCOqDSsTV
— OpIndia.com (@OpIndia_com) January 18, 2022
१. मुफ्ती पुढे म्हणाल्या की, उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सत्तेसाठी हिंदु आणि मुसलमान यांच्यात द्वेष निर्माण करत आहे. भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत. (काश्मीरला देशापासून तोडण्याचे कारस्थान कोण रचत आहे, हे जनता जाणून आहे ! – संपादक) त्यामुळे देशाला भाजपपासून स्वातंत्र्य हवे आहे.
२. युवकांनी लेखणी आणि विचार यांच्या आधारावर भाजपशी लढा द्यावा. दगड आणि बंदूक कधीही उचलू नका. (सैन्यावर दगडफेक करणार्यांची, तसेच आतंकवाद्यांची सतत बाजू घेणार्या मुफ्ती यांचे हास्यास्पद विधान ! – संपादक) कारण भाजप याचीच वाट पहात आहे.