शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन्.डी. पाटील यांचे निधन !
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन्.डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापूर येथे उपचार चालू असतांना निधन झाले. वर्ष १९८० मध्ये ते राज्यातील सहकारमंत्री होते. महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता. कोल्हापूर येथे झालेल्या पथकर आंदोलनात त्यांचा सहभाग होता.