नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई – भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नितेश राणे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तोपर्यंत अटकेपासून संरक्षणाची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्याने राणे यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करता येणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर जीवघेणे आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. राणे यांच्यासह गोट्या सावंत यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.