लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे
१. घसा लाल होणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, तसेच सर्दी, खोकला
अ. सितोपलादी चूर्ण – पाव चमचा (१ ग्रॅम) चूर्ण दिवसातून ५ – ६ वेळा चघळून खावे किंवा थोड्याशा मधात मिसळून चाटावे.
आ. चंद्रामृत रस (गोळ्या) – २ – २ गोळ्या दिवसातून २ वेळा चघळून खाव्यात.
वरील उपचार ३ ते ५ दिवस करावेत.
२. ताप किंवा कणकण
अ. त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या) – १ – १ गोळी २ वेळा घ्यावी. ताप उतरत नसल्यास प्रत्येक ४ घंट्यांनी १ गोळी मध किंवा कोमट पाण्यासह घ्यावी.
आ. महासुदर्शन घन वटी – १ – १ गोळी २ वेळा घ्यावी. ताप उतरत नसल्यास प्रत्येक ४ घंट्यांनी १ गोळी मध किंवा कोमट पाण्यासह घ्यावी.
वरील उपचार २ ते ३ दिवस करावेत.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०२१)