उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील वैद्यकीय अधिकार्‍यांची धर्मांधांकडून हत्या !

  • ४ धर्मांधाना अटक !

  • मुख्य आरोपी पसार !

  • क्रूर मानसिकतेच्या धर्मांधांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक 
  • संख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य ! – संपादक 
डावीकडे डॉ. हनुमंत धर्मकारे

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) – येथील आर्.पो. उत्तरवार फुटीर रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची ११ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी हत्या केली. या हत्येसाठी मुख्य आरोपीला साहाय्य करणार्‍या सय्यद तौसिफ सय्यद खलील (वय ३५ वर्षे), सय्यद मुस्ताक सय्यद खलील (वय ३२ वर्षे), शेख मोहसिन शेख कय्युम (वय ३४ वर्षे), शेख शहारूख शेख आलम (वय २७ वर्षे) या ४ धर्मांधांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार (वय २२ वर्षे) अजूनही पसार आहे. त्याने पूर्ववैमनस्यातून डॉ. धर्मकारे यांच्यावर पाळत ठेवून उमरखेड-पुसद रस्त्यावरील साखळी महाविद्यालयासमोर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुन्ह्याचा तपास व्यावसायिक कौशल्याचा आणि पुराव्यांचा पुरेपुर उपयोग करीत ४८ घंट्यांत उघडकीस आणल्याविषयी पोलीस अधीक्षकांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकार्‍यांना १ लक्ष रुपये प्रोत्साहनपर बक्षीस घोषित केले आहे.