दायित्व घेऊन सेवा करण्याविषयी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांना सुचलेले विचार !
‘मी ध्वनीचित्रीकरणाच्या संकलनाची सेवा करते. पूर्वी मला जेवढे शिकवले जायचे, तेवढेच मी करायचे. त्याच्या व्यतिरिक्त काही चुकल्यास मी म्हणायचे, ‘‘मी हा भाग शिकले नाही.’’ तेव्हा सहसाधकांनी मला समजावून सांगितले. त्यातून मला साधनेसाठी योग्य दिशा मिळाली आणि माझा उत्साह वाढला.
१. आईला तिचे बाळ सांभाळतांना तपाससूची लागत नाही; मात्र परिचारिकेला लहान बाळ सांभाळायला तपाससूची लागते, असे परात्पर गुरूदेवांनी सांगणे
सहसाधकांनी मला सांगितले, ‘‘एकदा प.पू. गुरुमाऊलींकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) चित्रीकरणाची सेवा करणारे साधक मोठी तपाससूची घेऊन गेले. प.पू. गुरुमाऊलींनी सांगितले, ‘‘आईला तिचे बाळ सांभाळतांना तपाससूची लागते का ? परिचारिकेला लहान बाळ सांभाळायला तपाससूची लागते.’’
२. सेवेचे दायित्व घेतल्यावर आणि मनापासून सेवा केल्यावर देव सेवेतील बारकावे शिकवत असणे
या उदाहरणावरून मला शिकायला मिळाले, ‘जेव्हा आपण सेवेचे दायित्व घेतो किंवा दिलेली सेवा आपल्याला आपली वाटायला लागते, तेव्हा तपाससूची असो किंवा नसो, आपण प्रत्येक गोष्ट बाळाला सांभाळणार्या आईप्रमाणे लक्ष देऊनच ती पूर्ण करतो. जोपर्यंत आपण सेवेचे दायित्व घेत नाही, तोपर्यंत आपल्याला परिचारिकेप्रमाणे तपाससूची घेऊन प्रयत्न करावे लागणार. आपण एखादी गोष्ट मनापासून करायला लागतो, तेव्हा देव आपल्याला त्या सेवेतील बारकावे शिकवत असतो आणि आपण आनंदाने सेवा करायला लागतो; नाहीतर तोपर्यंत आपल्याला त्या सेवेत केवळ अडचणी आणि गार्हाणीच (तक्रारीच) दिसत असतात.’
‘आपण कुठल्या टप्प्यात आहोत’, याचा अभ्यास करून सेवा आत्मसात होण्यासाठी देवाला शरण जाऊन प्रार्थना करूया.
३. कृतज्ञता
प.पू. गुरुमाऊली सहसाधकांच्या माध्यमातून आपल्याला सतत शिकवत असतात आणि आपल्या साधनेतील अडथळे दूर करत असतात. प.पू. गुरुमाऊली आणि गुरुरूपातील सहसाधक यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सौम्या कुदरवळ्ळी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१८.११.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |