उंचगावसह (जिल्हा कोल्हापूर) प्रत्येक गावातील ७/१२ उतार्यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – उंचगावसह प्रत्येक गावात सध्या ‘ऑनलाईन’ उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले आहे; मात्र असे होत असतांना पूर्वी असलेल्या हस्तलिखितातील नावे योग्य असून ‘ऑनलाईन’ उतार्यात मात्र नावात पालट झालेले दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना खरेदी-विक्री करता, तसेच बँक कर्जासाठी अडचणीचे ठरत आहे. तरी उंचगावसह प्रत्येक गावातील ७/१२ उतार्यातील ‘ऑफलाईन’वर असणारी नावे ‘ऑनलाईन’वर चुकीची आल्याने ती तात्काळ दुरुस्त करावीत, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने करवीर नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना देण्यात आले.
या वेळी उंचगाव प्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, श्री. अरविंद शिंदे आणि श्री. विशाल हांगीरकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.