सांगली येथील सनातनचे संत पू. संकेत कुलकर्णी यांच्यासाठी नामजप करतांना त्यांच्या आईला झालेले त्रास !

सांगली येथील सनातनचे विकलांग आणि ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी (वय ३२ वर्षे) यांच्यासाठी नामजप करतांना त्यांच्या आईला झालेले त्रास !

१६.१.२०२२ या दिवशी पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

‘जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून पू. संकेतदादांचा अपचनाचा त्रास वाढला. त्यांना सतत ढास लागणे, ‘उलट्या होणे, पोट बिघडणे, शौचावाटे रक्त पडणे, पाणीही न पचणे, सतत झोपून रहावे लागणे’, असे त्रास होत होते. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. दादासांठी ३ घंटे नामजप सांगितला होता. हा नामजप करतांना मला झालेले त्रास येथे दिले आहेत.


या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
जन्मतः विकलांग असलेले आणि कोरोना महामारीचे संकट, तसेच स्थूलातील अन् सूक्ष्मातील आक्रमणे यांतही गुरुकृपेने रक्षण झालेले सनातनचे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी ! https://sanatanprabhat.org/marathi/544259.html

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी

१. नामजप करतांना पुष्कळ अडथळे येणे

पू. संकेतदादांसाठी नामजप करतांना मी पू. संकेतदादांवरील ‘आवरण काढणे, त्यांच्यावर कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे’, असे प्रयत्न करत होते. आरंभी नामजप करतांना माझे मन एकाग्र होत नव्हते. घरात मला सतत अदृश्य शक्तींचा वावर जाणवत असे. अशा वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ आर्तभावाने प्रार्थना करत असे. नामजप करतांना माझे मन अस्वस्थ असायचे. त्यामुळे मला ‘नामजप झालाच नाही’, असे वाटायचे. नामजपाला बसल्यावर ‘कुणाचा तरी भ्रमणभाष येणे, दारावरची घंटा वाजणे, दार उघडल्यावर बाहेर कुणी न दिसणे’, असे त्रास होत होते. असे झाल्यावर मला ‘नामजपाला बसू नये’, असे विचार येत असत; पण पू. संकेतदादांवर अनिष्ट शक्तींचे आक्रमण झाले की, त्यांचा त्रास मला पहावत नसे. त्यामुळे पुन्हा ‘नामजप करूया’, असे वाटून मी तो नामजप पूर्ण करत असे.

सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करणे

पू. संकेतदादांसाठी नामजप करत असतांना आम्हालाही (मी आणि यजमान यांना) अनिष्ट शक्तींचा त्रास होत असे. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना होत असे, ‘आमच्यात पू. संकेतदादांसाठी नामजप करण्याचे सामर्थ्य नाही. तुम्हीच आमच्याकडून परिणामकारक आणि भावपूर्ण नामजप करवून घ्या.’

३. झोप येऊन मनावर पुष्कळ दडपण येणे

काही वेळा मला पुष्कळ झोप येऊन असंख्य दृश्ये दिसायची. त्या कालावधीत मी दिवसाही पुष्कळ झोपत असे. तेव्हा पुष्कळदा मला वाटायचे, ‘एखादी कृती मी केली आहे’; पण प्रत्यक्षात मी ती केलेली नसायची. या गोष्टीचे माझ्यावर पुष्कळ दडपण येत असे.

४. निरर्थक विचार मनात येणे

मला सतत ‘मला काहीतरी मोठा आजार झाला आहे’, असे वाटायचे. कोणतेही काम किंवा सेवा करतांना माझ्या मनात ‘मला हे जमेल का ? झेपेल का ?’, असे निरर्थक विचार येत असत.

५. साधिकेवर आवरण येऊन तिला काही न सुचणे

या कालावधीत माझी पुष्कळ द्विधा मनस्थिती असायची. ‘पू. संकेतदादांना अन्न पचणे’, ही आमच्या साधनेतील परीक्षा होती. माझ्या साधनेत सातत्य नसल्याने माझ्यावरील आवरण वाढले होते. त्यामुळे मला १८ – २० वेळा आवरण काढायला सांगितले होते.

अशा प्रकारे प्रतिदिन नवीन त्रास होत असत. गुरुकृपेने मला ‘हे नामजप होऊ नये, यासाठी अनिष्ट शक्तींनी अवलंबलेले मार्ग आहेत. मला प्रत्यक्षात काहीही झालेले नाही’, हे समजले. साधकांच्या साहाय्याने या त्रासांवर मात करता आली. यासाठी सर्वांप्रती कृतज्ञता !

(समाप्त)

– सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी, सांगली (२.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक