५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली येथील चि. आराध्या रूपेश पारधी !

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. आराध्या रूपेश पारधी (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. आराध्या रूपेश पारधी ही या पिढीतील एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. आराध्या रूपेश पारधी हिचा कोजागरी पौर्णिमेला (२०.१०.२०२१) वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. आराध्या पारधी

१. जन्मापूर्वी

सौ. दुर्गा पारधी

अ. ‘ पुसद येथील धर्मसभेच्या दिवशी मला गर्भधारणा झाल्याचे कळले. त्यामुळे ‘मला प्रसादरूपी बाळ मिळाले’, असे मला वाटले.

आ. ‘गरोदरपणात माझ्याकडून नियमित नामजप व्हायचा. मी श्रीकृष्णाची आळवणी करत असतांना गर्भातील बाळ हालचाल करून प्रतिसाद द्यायचे. मी पोटावर हात ठेवून प.पू. भक्तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) भजने म्हणतांना आणि ग्रंथ वाचन करतांना ‘गर्भ आनंदाने पोटात नाचत आहे’, असे मला जाणवत असे.

इ. गरोदरपणात माझ्या स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले येऊन ते मला ‘सकारात्मक विचार करायला सांगत आहेत’, असे मला वाटायचे.

ई. गरोदरपणात मला ९ मास सत्संग ऐकण्याची संधी मिळाली.

उ. सनातन संस्था घेत असलेल्या सत्संगात येण्याआधी मला पुष्कळ त्रास होत होता. माझा ४ वेळा गर्भपात झाला होता. मी सत्संगात जाऊ लागल्यावर सत्संगातील साधिका सौ. खाडे यांनी मला देवतांच्या चित्रांचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगितले. त्या उपायांचा मला चांगला परिणाम जाणवला. मी अत्तर आणि कापूर यांचे नियमित उपाय केले. मी पोटाला विभूती लावून झोपायचे. त्यामुळे माझे त्रास उणावले.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ४ मास

२ अ १. व्यावहारिक अडचणी दूर होणे : चि. आराध्याच्या जन्मानंतर आमच्या कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी दूर झाल्या. आमच्या घराच्या जागेचे थांबलेले काम पूर्ण झाले.

२ अ २. सात्त्विकतेची ओढ

अ. जन्मापासूनच आराध्या हाताच्या बोटांची मुद्रा करूनच झोपते.

आ. आराध्या १५ दिवसांची असल्यापासून पहाटे ४ वाजता उठून गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघून हसत आणि खेळत रहायची.

इ. आराध्या ४ मासांची असतांना एका साधिकेने ‘गुरुशक्ती प्रदान सोहळा’ हा दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक मला दिला. तो पहाताच तिने त्या अंकावर झेप घेतली. ‘ती श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींशी हसत बोलत आहे’, असे मला जाणवत होते. ती तो अंक जवळ घेऊनच पाळण्यात झोपली. अंक खाली पडताच ती झोपेतून उठून रडायला लागली.

३. वय ५ ते १२ मास

अ. मी तिला घेऊन गुरुपौर्णिमेच्या अर्पण आणि प्रसार या सेवा करण्यास जात असतांना तिने मला कुठलाही त्रास दिला नाही.

आ. चि. आराध्या गुरुवारी होणारा राष्ट्रीय भावसत्संग ऐकते. एका भावसत्संगाच्या आदल्या दिवशी हनुमान जयंती होती. भावसत्संग ऐकतांना अचानक तिला पोटाजवळ पिल्लू घेतलेली एक वानरी दिसली. ती आमच्या घराजवळ बसून कैरी खात होती. आराध्या तिच्याकडे पाहून हसत असतांना वानरीने ती कैरी तिथेच ठेवून ती निघून गेली. तेव्हा ‘हनुमंताने आराध्याला प्रसाद दिला’, असे मला जाणवले.

इ. चि. आराध्या ‘साष्टांग नमस्कार करणे, तसेच तुळशी वृंदावनाला नमस्कार करणे’, अशा कृती सहजपणे करते.

४. वय : १ ते ३ वर्षे

४ अ. ऐकण्याची वृत्ती : दळणवळण बंदीच्या काळात तिला बाहेर न जाण्यास सांगितले होते. तेव्हा ती फाटकाच्या बाहेर न जाता आतच खेळायची.

४ आ. प्रेमभाव : आमच्या घरासमोर प्रतिदिन मांजर, कुत्रा आणि गोमाता येऊन बसतात. तेव्हा आराध्या त्यांना पोळी देते आणि त्यांच्याशी बोलते. फुलपाखरे आणि चिमण्याही तिच्या जवळ येतात.

४ इ. आराध्याला चूक सांगितल्यावर ती दोन्ही कान पकडून क्षमा मागते.

४ ई. सात्त्विकतेची ओढ

१. आराध्या दीड वर्षाची असल्यापासून ‘ऑनलाईन’ बालसंस्कार सत्संग ऐकते आणि बालसाधक दिसल्यावर नमस्कार करते.

२. ती ‘देवाची गाणी ऐकणे किंवा देवघरातील देवतांच्या मूर्तींना नैवेद्य भरवणे’, अशा खेळांमध्ये रमते.

३. आराध्या तिचे बाबा आणि आजी-आजोबा यांना अत्तर अन् कापूर देऊन ‘नामजप करायला बसा’, असे सांगते.

४. तिने तिच्या आजीला (टिकली ऐवजी) कुंकू लावायला सांगितले. त्यानंतर त्यांनी कुंकू लावायला आरंभ केला. ती नेहमी त्यांना कुंकू लावायची आठवण करून देते.

५. ती स्वत: स्वतःवरील आवरण काढते आणि घरातील सर्वांनाही आवरण काढण्यास सांगते.

६. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे दिसताच ती ‘बाबा’, असे म्हणून त्यांच्या छायाचित्रांना नमस्कार करते.’

– सौ. दुर्गा पारधी (चि. आराध्याची आई)

श्री. रूपेश पारधी

४ उ. नामजपाची आवड : ‘सकाळच्या वेळी मी नामजप करत असतांना आराध्या माझ्या मांडीवर येऊन बसून नामजप करते. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘कृष्ण आले’, असे म्हणून ती माझ्या डोक्यावर हात ठेवते. ती माझ्या डोळ्यांकडे पाहून नामजप करते. तेव्हा माझी भावजागृती होते.’

– श्री. रूपेश पारधी (चि. आराध्याचे वडील), यवतमाळ

४ ऊ. भाव : ‘आराध्या प.पू. गुरुदेवांशी बोलत असते. ती त्यांच्या छायाचित्राकडे पाहून प्रार्थना करते.

५. स्वभावदोष

चिडचिडेपणा आणि हट्टीपणा.’

– सौ. दुर्गा पारधी (आराध्याची आई), यवतमाळ (१६.१०.२०२१)

धारिकेचे टंकलेखन करतांना झालेले त्रास : ‘या धारिकेतील सूत्रांचे टंकलेखन करतांना मला पुष्कळ अडचणी आल्या, उदा. विद्युत् पुरवठा खंडित होणे, संगणकात बिघाड होणे, अन्य तातडीच्या सेवांमुळे टंकलेखन प्रलंबित रहाणे, प्रकृतीच्या अडचणी वाढणे इत्यादी.’ – श्री. लहू खामणकर, यवतमाळ


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक