राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८
|
बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !
|
|
‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंसाठी वर्ष २०२१ हे वर्ष भीतीचे, हत्यांचे, रक्ताचे आणि अश्रूंचे होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार जगाने पाहिले. धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांवर आणि दुर्गादेवीच्या मंडपांवर आक्रमणे केली. ‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ (बांगलादेश राष्ट्रीय हिंदु संघटना) संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष २०२० मध्ये १४९, तर वर्ष २०२१ मध्ये १५२ जण मारले गेले. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी (तिप्पटीने) अधिक आहे.’
भारतमाता आणि भूमाता यांच्या विरोधात अवमानकारक विधानेकरणार्या पाद्र्यावरील गुन्हा रहित करण्यास मद्रास उच्च न्यायालयाचा नकार
भारतमाता’ आणि ‘भूमाता’ यांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणारे तमिळनाडूतील पाद्री जॉर्ज पोन्नैया यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला.
पोन्नैया यांनी काय म्हटले होते ?
पोन्नैया यांनी भूमाता आणि भारतमाता यांचा ‘महामारी आणि अस्वच्छता यांचा स्रोत’, म्हणून उल्लेख केला आहे. त्यांनी ‘भारतमातेला त्रास देण्याची इच्छा नसल्यामुळे गांधी पादत्राणे घालत नाहीत. आमचे पाय अस्वच्छ होऊ नयेत आणि भारतमातेमुळे आम्हाला कोणताही आजार होऊ नये, यासाठी आम्ही (ख्रिस्ती) पादत्राणे घालतो’, असे म्हटले होते.’
सरकारी स्तरावर अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटून चीनची दादागिरी !
‘चीनने सरकारी स्तरावर अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली आहेत. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव पालटण्याने वस्तूस्थिती पालटत नाही. स्थानांची नावे पालटण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, असे म्हटले आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेश तिबेटचा भाग असल्याचा दावा करत आला आहे. तिबेटवर सध्या चीनचे नियंत्रण आहे.’