परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांचे सदर म्हणजे, ईश्वराचे विविध विषयांवरील दिशादर्शन !
‘प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चौकट स्वरूपात प्रकाशित होणारे माझे विचार हे केवळ दिवसभरात माझ्या मनात येणारे विचार असतात. देवाने मनात विचार दिला की, मी तो लिहून काढतो. त्यासाठी खूप काही विचार करणे, चिंतन-मनन करणे, ग्रंथवाचन करणे असे काहीच केलेले नसते. केवळ देव सुचवतो, ते लिहून काढतो. यात कोणतेही पांडित्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच सांगितलेली गीता कळणे; पण इतरांना अनेकदा अभ्यासूनही न कळणे !
‘श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच आणि काही श्लोकांतच गीता सांगितली अन् अर्जुनाला ती कळली. यावरून अर्जुनाची क्षमता किती असेल, ते लक्षात येते. आपण गीता अनेकदा वाचूनही आपल्याला ती कळत नाही. त्यामुळे त्यानुसार आचरण करणे, तर दूरचीच गोष्ट झाली !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
गुरुप्राप्तीसाठी लायकी हवी !
‘बहुतेकांना पुष्कळ प्रयत्न करूनही गुरुप्राप्ती होत नाही. याउलट अर्जुनाला काही प्रयत्न न करता श्रीकृष्णासारखा गुरु लाभला, म्हणजे त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असेल, हे लक्षात येते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)