श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील अर्पण पेटीत भाविकांकडून १ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक अर्पण !

श्री महालक्ष्मीदेवीची १४ जानेवारी या दिवशी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली विशेष पूजा

कोल्हापूर, १४ जानेवारी (वार्ता.) – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन सिमतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील १२ अर्पण पेट्यांमधील अर्पणाची मोजणी पूर्ण केली असून त्यातून एकूण १ कोटी ६० लाख ६४ सहस्र ६४३ रुपये अर्पण मिळाले आहेत. गरुड मंडपात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे रोखपाल आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांचे कर्मचारी यांनी ही मोजणी केली. परकीय चलन, सोन्याचे दागिने खजिन्यात जमा केले आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या काळात दीर्घ काळ मंदिर बंद होते. नवरात्रीत मंदिर भाविकांसाठी खुले झाले. त्यामुळे अनेक भाविकांनी अर्पण पेटीत रोख रक्कम, दागिने, तसेच अन्य वस्तू अर्पण केल्या होत्या. या पेट्यांमध्ये मंगळसूत्र, श्री गणपतीची मूर्ती, सोन्या-चांदीचे दागिने आणि परकीय चलन मिळून आले. सोनारांकडून याची मोजणी करून घेण्यात येणार आहे, असे नाईकवाडे यांनी सांगितले.