घाटकोपर येथील विकास विद्यालयाला सनातन-निर्मित ग्रंथ भेट
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत उपक्रम
मुंबई, १४ जानेवारी (वार्ता.) – सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत घाटकोपर पूर्व येथील वनिता विकास मंडळ संचालित विकास विद्यालयाच्या पदाधिकार्यांची नुकतीच भेट घेण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालक यांसाठी मार्गदर्शक असलेले विविध विषयांवरील ३७ ग्रंथ विद्यालयातील ग्रंथालयाला भेट स्वरूपात देण्यात आले.
हे ग्रंथ घाटकोपर येथील ‘सातेरी कॅटरर्स’चे मालक आणि समाजसेवक श्री. विजय तळेकर यांनी प्रायोजित केले आहेत. सनातन-निर्मित ग्रंथांचा संच मुख्याध्यापक प्रफुल्ल सुभेदार आणि ग्रंथपाल सुषमा सुमंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश सोनार, रवींद्र नलावडे, तसेच समाजसेवक श्री. विजय तळेकर उपस्थित होते.