नागपूर येथे रेल्वेतील नळांची चोरी करणार्या एकाला अटक
नागपूर – येथील रेल्वेतील नळांची चोरी करणारा आरोपी सिकंदर जहीर खान याला रेल्वे सुरक्षा दलाच्या सैनिकांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. (स्वतःला अल्पसंख्यांक समजणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! – संपादक) त्याच्याकडून ५५ नळ जप्त केले असून त्याने आजवर २०० हून अधिक नळ चोरून नेले आहेत, अशी माहिती दिली. सिकंदर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एक्सप्रेस गाड्यांच्या ‘स्लीपर कोच’च्या स्वच्छतागृहातील नळांची चोरी करत होता. चोरलेले नळ विकून मिळणार्या पैशांतून सिकंदर त्याचे अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करत असे. ‘आर्.पी.एफ्.’च्या सैनिकांनी त्याला अटक केली.