जीतेंद्र नारायण त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी) यांना अटक
हरिद्वार येथील धर्मसंसदेत कथित द्वेषपूर्ण भाषणे केल्याचे प्रकरण
हिंदु धर्माच्या विरोधात धर्मांध सातत्याने द्वेषपूर्ण वक्तव्ये करत असतात. त्यांच्यावर इतक्या तत्परतेने कारवाई केली जाते का ? केवळ हिंदूंच्याच विरोधात एवढी तत्पर कारवाई करणे, हा पोलिसांचा दुटप्पीपणाच ! – संपादक
हरिद्वार – शहरात १७ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या धर्मसंसदेत कथित द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी जीतेंद्र नारायण त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी) यांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली. १३ जानेवारीला हरिद्वारच्या नारसन सीमेवर त्यागी यांना अटक करून हरिद्वार नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या विरोधात पोलीस ठाण्याबाहेर अनेक हिंदू जमा झाले.
Uttarakhand: Wasim Rizvi aka Jitendra Tyagi arrested in connection with Haridwar ‘Dharm Sansad’ hate speech casehttps://t.co/ArfFPcK7Od
— OpIndia.com (@OpIndia_com) January 14, 2022
त्यागी यांच्या अटकेच्या वृत्ताला उत्तरप्रदेशातील डासना मंदिराचे प्रमुख यति नरसिंहानंद यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणी हरिद्वार येथील गुलबहार खान यांनी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, जितेंद्र नारायण त्यागी या नावाने ओळखले जाणारे वसीम रिजवी यांनी अन्य काही लोकांसमवेत एकत्र येऊन प्रेषित महंमद पैगंबर आणि त्यांचे अनुयायी यांच्या विरोधात चुकीची विधाने केली आहेत.