माहीम गडावर वसाहत निर्माण करून धर्मांधांनी संपूर्ण गडच बळकावल्याचा धक्कादायक प्रकार !
|
गड आणि दुर्ग यांच्या संवर्धनाची सरकारची घोषणा; पण धर्मांधांनी बळकावलेल्या गडांचे काय ? – संपादक
मुंबई, १४ जानेवारी (वार्ता.) – मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहीम गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा गडावरील राज्य पुरातत्व विभागाची मालकी केवळ नावापुरती आहे. प्रत्यक्षात धर्मांधांनी घुसखोरी करून संपूर्ण गडच बळकावला आहे. एकीकडे गड आणि दुर्ग यांचे संवर्धन करण्याची घोषणा सरकारने केली आहे; मात्र दुसरीकडे माहीमचा गडच धर्मांधांनी कह्यात घेतला आहे.
याच प्रकारे राज्यातील अनेक गडांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. त्याविषयी मात्र सरकार आणि पुरातत्व विभाग गप्प आहे.
प्राचीन काळी राजा प्रतापबिंब याने मुंबईच्या समुद्र किनार्यावर स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. त्या वेळी राजधानी म्हणून त्याने महिकावतीची (आताचे माहीम) निवड केली. महिकावतीदेवीच्या नावावरून या भागाला ‘माहीम’ असे नाव पडले आहे. राजा प्रतापबिंब याच्या काळात म्हणजे साधारण १४ व्या शतकाच्या कालखंडात माहीमचा गड बांधण्यात आल्याचा इतिहास आहे. हा गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत या गडाचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले असून येथे बहुसंख्येने धर्मांधांची वसाहत आहे.
(याविषयीची सविस्तर माहिती छायाचित्रांसह लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)