मकरसंक्रांतनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वाणवसा नेण्यास बंदी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेले नियम आणि अटी यांनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मकरसंक्रांत सणानिमित्त चालू रहाणार आहे; मात्र मंदिर आणि मंदिराच्या परिसरात वाणवसा देण्यास आणि घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. भाविकांना मंदिरात मुख दर्शनासाठी जातांना हार आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे देवास्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, मकरसक्रांत सणानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आणि श्री रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी सहस्रो महिला मंदिरात येतात. ही परंपरा आहे.