१४ जानेवारी २०२२ या दिवशी ‘मकरसंक्रांत’ आहे. त्यानिमित्ताने….

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांतीचे महत्व

१. तिथी

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित् प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो. पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा इत्यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते.

२. इतिहास

संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

तीळगूळ

३. मकरसंक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसांतील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

४. तीळगुळाचे महत्त्व

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)