इटलीमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस !
पोलिसांकडे तक्रारी दाखल
वर्ष २०१६ या ख्रिस्ताब्द वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात जर्मनीत धर्मांध शरणार्थींनी शेकडो महिलांचा केला होता विनयभंग !
याआधी ३१ डिसेंबर २०१५ आणि १ जानेवारी २०१६ या दिवशीही जर्मनीमधील कोलोन, हॅम्बर्ग आणि अन्य शहरांमध्ये नववर्ष साजरे करणार्या महिलांचा विनयभंग झाल्याच्या शेकडो घटना समोर आल्या होत्या. त्यांमध्ये इराक, सीरिया आणि उत्तर आफ्रिका येथून आलेल्या धर्मांधांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे समोर आले होते. |
मिलान (इटली) – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिलान येथील ‘कॅथॅड्रल’च्या (जिल्हा स्तरावर सर्वांत महत्त्वपूर्ण चर्चच्या) जवळील चौकात नववर्ष साजरे करतांना तरुण मुलांनी महिलांना घेरून अंधारात त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मिलानमधील ड्युमोनो चौकात आणि जवळील रस्त्यांवर इटलीचे नागरिक आणि परदेशी नागरिक यांच्या जमावांनी घेराव घातला, अशी तक्रार ५ महिलांनी केली आहे. याचे व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.
Nine women say they were assaulted by groups of young men in Milan’s main square during the celebrations. https://t.co/GYUi9baLIR
— euronews (@euronews) January 12, 2022
या दृष्टीने ‘कोणत्याही महिलेवर अत्याचार झाले असतील, तर तिने पोलिसांकडे तक्रार करावी’, असे आवाहन इटली पोलिसांनी केले आहे. इटलीतील ‘कोरीरे डेला सेला’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. ‘पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. जे लोक महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचार यांसाठी उत्तरदायी आहेत, त्यांना त्वरित न्यायालयासमोर उभे करण्यात येईल’, असे वक्तव्य इटलीतील मंत्री लुसिआना लेमोर्जिस यांनी केले आहे.