अलवर (राजस्थान) येथे एका अल्पवयीन मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार !
अन्य एका घटनेत सामूहिक बलात्कार पीडितेने केली आत्महत्या !
काँग्रेस सरकार असलेल्या राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची घटना ! महिलांच्या हिताच्या कैवारी असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वढेरा यांना आता काय म्हणायचे आहे ? – संपादक
अलवर (राजस्थान) – येथील एक मूकबधीर आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. बलात्कार करणार्यांनी मुलीच्या गुप्तांगांमध्ये धारदार वस्तू घालून तिला घायाळ केले. एका खासगी बसमध्ये हा अत्याचार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत चिकित्सालयात नेण्यात आले. तिच्यावर तब्बल ३ घंटे शस्त्रक्रिया चालली.
अलवर की ‘निर्भया’ से राजस्थान शर्मसार, क्या सच में सरकार शून्य हो गई! #RajasthanRapeCase #AlwarRapeCase #AlwarPolice #RajasthanGovernment https://t.co/CX5AQ8GCiA
— NBT Hindi News (@NavbharatTimes) January 13, 2022
काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील कैथवाडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या एका अल्पवयीन मुलीने सामाजिक अपमान सहन करावा लागू नये, म्हणून आत्महत्या केली. हाफिज आणि मनीष या वासनांधांनी तिचे अश्लील व्हिडिओ बनवले होते आणि सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारितही केले होते.