मध्यप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्या ४ ख्रिस्त्यांना अटक !
|
|
सीहोर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील गुराडी गावात गेल्या काही आठवड्यांपासून ४ ख्रिस्ती येऊन हिंदु असलेल्या गावकर्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध प्रकारची आमिषेही दाखवत आहेत. मनोहर बंसल नावाच्या हिंदु गावकर्याने या विषयीची माहिती इछावर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर काही गावकर्यांनी या ४ ख्रिस्त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अध्यादेशा’तील कलम ३ आणि ५ यांच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. तगराज, राजाराम मालवीय, सुनील मालवीय आणि तेज सिंह अशी अटक करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांची नावे आहेत. (बाटलेले हिंदु स्वत:चे नाव पालटत नाहीत; कारण त्यांना अन्य हिंदूंमध्ये मिसळून त्यांचे धर्मांतर करणे सोपे जाते. अशा कावेबाज ख्रिस्त्यांपासून सावधान ! – संपादक)
१. गेल्या काही दिवसांपासून गुराडी गावामध्ये काही लोक येऊन हिंदूंना आमिषे दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा दबाव आणत होते. ‘जगामध्ये येशू सोडून अन्य कुणीच देव नाही’, असे ते म्हणत होते.
२. बंसल यांनी तक्रारीमध्ये सांगितले की, या आरोपींनी एका मासापूर्वी मला भेटून ‘मी ख्रिरस्ती धर्म स्वीकारावा’, यासाठी दबाव बनवला होता. त्यांनतर १२ जानेवारीला पुन्हा भेटून धर्मांतर करण्यासाठी मला सांगू लागले. ‘मी हिंदु धर्म सोडणार नाही’, असे त्यांना म्हटल्यावर ते मला विविध प्रलोभने दाखवू लागले. ‘तुझ्या मुलांना विनामूल्य शिक्षण देऊ’, ‘तुला नोकरी लावून देऊ’, ‘कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करू’, तसेच ‘अधून-मधून तुला पैसेही देत जाऊ’, अशा प्रकारे त्याला आमिषे दाखवत होते.
३. त्यानंतर बंसल यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर चौघांना अटक करण्यात आली.