भगवंता, करा सौ. मनीषाताईला संतपदी विराजमान आता ।
‘७.३.२०२१ या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पुणे येथील साधिका श्रीमती पद्मा मोकाशे यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
शारीरिक त्रासातही अखंड सेवारत रहाते आमची ताई ।
वाटते असे की, ‘जणू तिला तिचे अस्तित्वच नाही’ ।। १ ।।
शारीरिक त्रासांवर मात करून ताई सतत आनंदी असते ।
वाटते असे की, ‘ताई सतत कृष्णाच्या अनुसंधानात रहाते’ ।। २ ।।
व्यस्त असूनदेखील ताई
आम्हा साधकांची मायेने चौकशी करते ।
‘प्रेमभाव’ गुण ताईकडून आम्हाला शिकायला मिळतो ।। ३ ।।
‘गुरुलीला’ सत्संगातून ताईच्या मुखातून ओसंडते ‘प्रीती’ ।
काय आणि किती सांगू तिच्याविषयी शब्दच अपुरे पडती ।। ४ ।।
जणूकाही प.पू. गुरुमाऊलीच ।
ताईच्या मुखातून बोलते ।। ५ ।।
आम्हा सर्व साधकांची एकच प्रार्थना भगवंता ।
‘लवकर तुझ्या चरणांशी ताईला घे आता ।। ६ ।।
भगवंता, कर ताईला संतपदी विराजमान आता ।।
दे आम्हा सर्व साधकांना लवकर ही आनंदवार्ता’ ।। ७ ।।
– श्रीमती पद्मा मोकाशे, हडपसर, पुणे. (७.३.२०२१)