भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते
भारताची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून मिळाले. काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे भारत हा हिंदूंना न मिळता ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश झाला. याचे अनेक दूरगामी परिणाम झाले. यातील एक म्हणजे ‘बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करत आहेत, तसेच हिंदु धर्माच्या विरोधात बोलत आहेत. ज्या वेळी भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.