शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरण !
अभिषेक सावरीकर यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा अश्विनकुमार यांचा खुलासा
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) या वर्ष २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढवण्यासाठी शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी अनुमाने ५ कोटी रुपये दिल्याचे ‘जी.ए. सॉफ्टवेअर’ आस्थापनाचे व्यवस्थापक अश्विनकुमार यांनी पोलिसांसमोर सांगितले. त्यामुळे ते परीक्षार्थी कोणत्या दलालांद्वारे संपर्कात आले होते ? सावरीकर यांनी किती पैसे घेतले ? याची चौकशी करायची आहे. यासाठी न्यायालयाने सावरीकर यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
टीईटी परीक्षेच्या आयोजनाचा ठेका घेतलेल्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर’ आस्थापनाचे संचालक डॉ. प्रीतेश देशमुख, सौरभ त्रिपाठी आणि सावरीकर यांची डिसेंबर २०१७ मध्ये देहली येथे बैठक झाली. त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करण्याची योजना आखली होती.